खामगाव : विधानसभा मतदार संघाचे आ.आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुर्व संध्येला ४ फेब्रुवारी रोजी रंगला खेळ पैठणीचा व नारी शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. नगर परिषद शाळा क्र. ६ च्या मैदानावर भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ चित्रा वाघ,अभिनेत्री ईशा केसकर यांच्या प्रसुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारो महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी हळदी कुंकू, गप्पा गोष्टी, प्रश्न मंजुषा, रंजक खेळ, मराठी – हिंदी गाण्यासह कॉमेडीचा तडका अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना पैठणी सह शेकडो आकर्षक बक्षिसे व उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आली तसेच शक्ती वंदन कार्यक्रमा अंतर्गत महिला बचत गट व महिला एनजीओची कार्यशाळा घेण्यात आली यावेळी महिला भगिनींनी आमदार आकाश फुंडकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तर बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत असून देशाच्या प्रगतीत महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे वाढदिवसाला त्यांचे शुभेच्छा रुपी आशीर्वाद प्राप्त होण्याचे सौभाग्य लाभल्याचे आ . आकाश फुंडकर म्हणाले. सौ चित्रा वाघ यांनी महिलांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर केल्याचे सांगितले.कार्यक्रमाला भाजपा सोशल मीडिया चे प्रदेश सहसंयोजक सागर फुंडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.