प्रगतशील शेतकऱ्यांचा केला गौरव
खामगाव : कृषी विभागाच्या वतीने २१ मे ते १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन केले होते त्याचा समारोप १ जुलै कृषी दिनी करण्यात आला. खामगाव पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त स्थानिक महात्मा गांधी सभागृहात कार्यक्रम पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ऍड. आमदार आकाश फुंडकर तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रेखाताई युवराज मोरे होत्या.तसेच गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी दीपक पटेल, तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव विशद केले.तर रब्बी हंगाम पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यामध्ये हरबरा पिक उत्पन्नात प्रथम हरिश्चंद्र गायगोळ काळेगाव,द्वितीय शुभम आखरे हिंगणा,तर तृतीय क्रमांक छाया संतोष काळे पळशी यांना मिळाला कापसामध्ये अधिक उत्पन्न घेणारे राजाराम टोंगळे उमरा, दिलीप मारके कारेगाव तसेच सोयाबीनमध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे संदीप ठाकरे अडगाव, निलेश ठोबळे गोंधनापूर या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांनी,संचालन पंचायत समिती कृषी अधिकारी व्ही. बी. राऊत तर आभार कृषी अधिकारी लोखंडे यांनी मानले. यावेळी जी. प.सदस्य पती ज्ञानदेव मानकर, ज्ञानदेव चिमनकार, माजी प.स.सभापती उर्मिलाताई गायकी, उपसभापती शितलताई मुंढे, प.स.सदस्य विलास काळे यांच्यासह जी. प.,प.स. सद्स्य तसेच कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.