खामगाव : गुरूनानक देवजी यांच्या 551वा प्रकाश पर्व भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला.यानिमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगाव मतदार संघाचे आमदार अँड आकाश फुंडकर यांनी खामगाव येथील गुरुद्वारा येथे माथा टेकून पूजा केली व शीख बांधवांना शुभेच्छा देत महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी त्यांच्यासोबत भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, महामंत्री जितेंद्र पुरोहित, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, नागेंद्र रोहनकार, सुभाष इटणारे आदी भाजपा पदाधिकारी यांचेसह गुरुद्वारा सेवा समिती चे राजेंद्रसिंघ कडीयाल, अमरजितसिघ बग्गा,सनीसिंघ चव्हाण, करमजितसिंघ जुनेजा आदी शीख बांधव उपस्थित होते.यावेळी आमदार अँड आकाश फुंडकर यांचेसह मान्यवरांचे गुरुद्वारा समिती चे वतीने स्वागत करण्यात आले.
previous post