April 4, 2025
जळगांव जामोद जिल्हा बातम्या बुलडाणा

आसलगावचे सुपुत्र राहूल मुळे यांना कर्तव्यावर असतांना आले विरमरण….

जळगाव जा:तालुक्यातील आसलगाव येथील रहिवासी असलेले राहूल मुळे सिएसआयएफ चे जवान यांना जम्मू काश्मीर मध्ये कर्तव्यावर असतांना २० जून रोजी विरमरण आले.राहूल मुळे यांना सुरवातीपासूनच लष्कराचे आकर्षक होते.त्यामुळे वयाच्या २७ व्या वर्षी सिएसआयएफ मध्ये भर्ती झाले होते. सहा वर्ष भारतमातेचे रक्षण केले अखेर वयाच्या ३३ व्या वर्षी जम्मू कश्मीर मध्ये कर्तव्य बजावत असतांना त्यांना विरमरण आले.२० जून रोजी ते नेहमी प्रमाणे ड्युटी करत असतांना त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांना ताबडतोब हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच त्यानी कायमचा जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूची माहिती गावकऱ्यासह त्यांच्या नातेवाईकांना समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली.राहूल मुळे अतीषय मनमिळावू स्वभावाचे होते. सुट्टी मध्ये घरी आल्यावर अगदी सर्व मित्र मंडळींना न चुकता भेटत होते.स्वभावाने अतिशय प्रेमळ असल्यामुळे सर्व गावासह नातेवाईक, मित्रमंडळी यांना मोठे दु:ख झाले आहे.त्यांचे पार्थिव २१ जून रोजी जम्मू कश्मीर येथून दिल्लीला आनले त्यांनतर २२ जून रोजी त्यांचे मुळगावी आसलगाव येथे आनले.सर्व प्रथम नातेवाईकांसह गावकऱ्यांनी त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या वर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबलकर,नायब तहसीलदार,सिएसआयएफ चे जवान, प्रसेनजीत पाटील, प्रकशसेठ ढोकणे,सरपंच सुनील डिवरे,उपसरपंच गणेश गिर्हे,विजय तीवारी,यासह मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील ग्रामस्थ हजर होते.

Related posts

भुखंड घोटाळ्यातील आरोपी विरूध्द आणखी दोन गुन्हे दाखल

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ५७ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये विद्यार्थी स्वयंप्रशासन व शिक्षकदिन साजरा…

nirbhid swarajya
error: Content is protected !!