शेगांव: आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य व रेल्वे प्रवासी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त शेगांव येथील रेल्वे स्थानकावर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबिरात १९ रक्तदात्यानी रक्तदान केले व समाज हिताला हाथभार लावला. आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य हा रक्तदान सेवेमार्फत समजतील गरजु व गरीब रुग्णांना मोफत रक्तदान व रक्तदाते पुरवण्याचे काम करते आणि अशाच विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजू व गरीब रुग्णांची रक्ताची समस्या सोडविण्याचे काम करते.आजच्या कार्यक्रमालाआजच्या रक्तदान शिबिरामध्ये राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ किरण ताई लंगोटे,सौ. मंदाकिनी चव्हाण, शितल शेगोकार,सौ. रत्नाताई डिक्कर, जयश्री देशमुख, सौ.शुद्धमती निखाळे,स्नेहलता दाभाडे,सौ.शिला सोनेकर,सपना शर्मा, अलका बांगर. आणि या पदाधिकाऱ्यांपैकी जयश्री देशमुख,सौ. शुद्धमती निखाडे, सपना शर्मा यांनी रक्तदान केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य चे सौरभ तराळे,महेश भारसाखरे,राहुल चव्हाण,आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष स्वप्निल भाऊ धांडे, वाशिम जिल्हा अध्यक्ष गौरव भाऊ वाळूकर, शेगांव अध्यक्ष राजेश भाऊ चव्हाण यांनी प्रयत्न केले व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला…
अकोला अमरावती खामगाव जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख शेगांव संग्रामपूर सामाजिक