खामगांव : एकीकडे तरूण युवक आपले भविष्य घडवण्यासाठी पोलीस भर्ती व आर्मी भर्ती करणारे युवक रोज पॉलिटेक्निक ग्राउंड वर रनिंग व प्रॅक्टिस करण्यासाठी जात असतात तर दुसरी कडे दारूला नादाला लागून आपले भविष्य खराब करणारे युवक दररोज पॉलिटेक्निक मैदानावर रात्रीच्या सुमारास दारू पिऊन दारूच्या बाटल्या फेकून देतात. त्यामुळे येथे पोलीस व आर्मी भर्तीच्या तयारी साठी येणारे युवक आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना ग्राउंड वर फुटलेल्या दारूच्या बाटल्या पडलेल्यामुळे विद्यार्थ्यांना इजा व्हायची व पसरत्या घाणीमुळे आरोग्यवर वाईट परिणाम होत होता. आज सकाळी आर्मी भरती साठी तयारी करणारे युवक व आरोग्य स्वस्थ राहावे त्यासाठी मॉर्निंग वॉक करणारे नागरिक यांनी मिळून पॉलीटेक्निक ग्राउंड येथे सकाळपासून स्वच्छता अभियान राबवले.
यात जवळपास ६५ किलो दारुच्या बाटल्या व ३० ते ४० किलो प्लास्टिकच्या स्वरूपात कचरा निघाला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी असे आव्हान केले की ग्राउंड वर येऊन पुन्हा कोणीही कचरा करू नये व पोलीसांनी मद्यप्रेमींवर लक्ष द्यावे ही विनंती निर्भिड स्वराज्यच्या माध्यमातून केली आहे. या स्वछता अभियानाच्या उपक्रमात रितेश काळे ,हितेश मल, राहिल देशमुख , योगेश शिंदे, साहिल किरोते, राहुल इंगळे, कर्मवीर कळसकार,नागेश साबे,गोपाल वाघमारे,संदेश सावळे,सौरभ मानमोडे ,पवन सपकाळ,प्रसाद वेरुळकर,विजय मौर्य,अंकित गायकवाड,गणेश शिरसाट,श्रीहरी भांबेरे,अंकित गावंडे यांचा सहभाग होता.