पोलिसांचे दुर्लक्ष,तीन वेळा पथक आले मात्र खाली हात परतले
खामगाव:येथील काही दिवसापूर्वी भूखंडांचे बनावट कागदपत्रे तयार करुन परस्पर विक्री करण्याच्य प्रकरणा विविध कलमान्वय गुन्हे दाखल झाला होता यामध्ये आरोपी प्रदीप प्रेमसुखदास राठी याला कोर्टाने काही अटी शर्ती घालून जमानात मंजूर केली आहे. परंतु त्या अटीचे उल्लंघन होत. असल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे. सर्रासपणे खामगाव शहरातील परिसरामध्ये आरोपी फिरत असल्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे.व घराच्या आजूबाजूला फिरत असून माझ्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. व आरोपीने न्यायालयाच्या घालून दिलेल्या अटीचा भंग केला असल्याची तक्रार निवेदन अंजू लवकेश सोनी यांनी शहर पोलीस स्टेशनला दिले आहे. तक्रार निवेदनाच्या प्रतिलिपी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेतपोलिसांना दिसेना,मात्र शहरात मुक्तसंचार
आरोपी घरात राहत असल्यासंदर्भाची रितसर तक्रार २४ सप्टेंबर २२,९ ऑक्टोंबर २२ ,१०ऑक्टोंबर २२, १२ ऑक्टोंबर २२ रोजी पोलीस विभागात तक्रारदाराकडून सादर करण्यात आली. तक्रारीच्या प्रतिलिपी गृहमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आले आहे यामध्ये गुन्ह्याचा उल्लेखही संदर्भात केला आहे. तसेच हायकोर्टाच्या जामीन अटींचे उल्लेख करत त्याची प्रतही तक्रार अर्जासोबत जोडली आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे अवमान होत असताना पोलिसांना मात्र आरोपी दिसला नाही हे विशेष. मात्र तक्रारदाराने आरोपीला जामीन मिळाल्यापासून आरोपी घरातच असल्याचे दररोजचे घरात येण्याचे जाण्याचे आणि शहरभर फिरण्याचे फूटेज सोबत जोडले आहे. तरी पोलिसांना तो कसा दिसला नाही, तसेच पोलिसांचे तर काही ‘अर्थपूर्ण’ संबंध नाही ना अशी चर्चा शहरभर आहे. तक्रार करता जामीन ना मंजूर करण्याकरता हायकोर्टात जाणार असल्याची चर्चा सुद्धा खामगाव शहरात सुरू आहे
आरोपी घरातच..?
स्थानिक पोलीस ठाणे आरोपीच्या घरापासून जवळच आहे.तसेच पोलिसांकडून कशाप्रकारे दुर्लक्ष होत आहे यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. यांनाही दूरध्वनीवर तक्रारदाराकडून माहिती देण्यात आली. मात्र तरी यासंदर्भात गांभीर्याने चौकशी करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज न तपासता पोलिसांनी सादर केलेल्या पंचनाम्यावर विश्वास ठेवण्यात आले असल्याची खंतही तक्रारदाराने व्यक्त केली.
