बुलडाणा-आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या २५% विद्यार्थ्यांची प्रतिपूर्ती रक्कम अद्याप न मिळाल्याने इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्यावतीने(मेस्टा) येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की,शासनाच्या नियमानुसार इंग्रजी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत २५% गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. मात्र शासनाकडून इंग्रजी शाळांना आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम देण्यास विलंब होत असतो.
दिं १ एप्रिल २०२२ रोजी इंग्रजी शाळा चालक संघटनेच्यावतीने २५% आरटी प्रतिकृतीची रक्कम देण्यात यावी, याबाबत जिल्हा परिषद बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले होते.मात्र सदर निवेदनावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली दिसत नाही. २५% आरटीई प्रतिपूर्ती रक्कम शासनाने सात महिन्यांपासून जमा केलेली असून शिक्षण संचालक पुणे यांच्या आदेशानुसार प्रथम हप्ता दिं ३१ डिसेंबर २०२१पूर्वी तथा दुसरा हप्ता ३१ मार्च २०२२ पूर्वी वितरित करण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.असे असून सुद्धा अद्याप इंग्रजी शाळांना आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम अदा करण्यात आलेले नाही. यामुळे ही रक्कम तवरी मिळावी, या मागणीकरिता आज इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्यावतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात साहेबराव भरणे, प्रा. रामकृष्ण गुंजकर, सागर उकर्डे, समाधान जाधव राहुल गव्हांदे, पंकज ठाकरे, शिवकुमार भातकडे, श्रीकांत चोपडे, महादेव भोजने, प्रभाकर बुराडे,नंदूसिंग मेहरे यांच्यासह महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाला यश;१५ दिवसात अनुदान देण्याचे आश्वासन
इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेच्या आक्रमक आंदोलने शिक्षण विभाग ताळ्यावर आला असून उपशिक्षणाधिकारी उमेश जैन यांनी दिनांक २३ मे २०२२ दुपारी आंदोलनाला भेट देऊन येत्या दहा ते बारा दिवसात जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळांना आरटीई प्रतिपूर्तीचे अनुदान देण्यात येईल असे, आश्वासन दिले.हे या आंदोलनाचे मोठे यश म्हणावे लागेल.या आश्वासन अनुदान न मिळाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे