तिघे अटकेत : १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त
शेगाव : शेगाव-खामगाव रोडवरील शिवराज फॉर्म हाऊस मध्ये आयपीएल वर जुगार खेळविल्या अजात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत यांना मिळाल्यावरून मंगळवारी रात्री टाकलेल्या धाडीत तिघांना अटक करण्यात आली आहे. क्रिकेट जुगारासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकुण 1,54,965 / -रु.चा माल जप्त करण्यात आला. शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत लासूरा फाट्याजवळील शिवराज फॉर्म हाऊस मध्ये आयपीएल वर जुगार खेळविल्या जात असलायची माहिती मिळाल्यावरून या ठिकाणी रात्री ८ च्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली. या धाडीत आरोपी आकाश धनजय शेळके वय 30 वर्ष रा सनिपॅलेस जवळ खामगांव, गणेश मनोहर बोरे वय 28 वर्ष रा . मोठी देवीजवळ जलालपुरा खामगांव आणि विशाल राजेश बोबडे वय 36 वर्ष रा बोबडे कॉलनी खामगांव हे क्रिकेट वर जुगार खेळत व खेळवीत असलयाचे दिसून आले. त्यांच्याकडून नगदी रोख 4,010 / – रुपये,13 मोबाइल फोन , एक लॅपटॉप , एक LED टी.व्ही , सेटअप बॉक्स , जुने दोन रिमोट , मोबाइल चार्जर जुनी बँग , कॅल्क्युलेटर असा एकुण १ लाख 54 हजार 955 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याबाबत चद्रकांत दिलीपराव बोरसे फौजदार अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय खामगांव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीं विरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसात अप क्र -84 / 2021 कलम 4,5 , महाराष्ट जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पो.स्ट.चे ठाणेदार गोकुळ सुर्यवशी हे करीत आहे.