खामगांव: महात्मा फुले जयंती निमित्त आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य व समस्त पळशी बू गावकरी मंडळी तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून एका वेगळ्या प्रकारे महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे विविध ठिकाणी जाऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते व या रक्तदान शिबिरात गोळा झालेल्या रक्त पिशव्या ते समाजात असणारे गरजू व गरीब रुग्ण यांना मोफत व अत्यल्प दरात उपलब्ध करून देतात.या कार्यक्रमाला समस्त गावकरी मंडळी यांनी मेहनत करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला व कार्यक्रमाला आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील दादा धांडे व युवा प्रदेश पदाधिकारी ऋषिकेश भाऊ मसने उपस्थित होते.
previous post
next post