January 1, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

शहर पोलिसांची कारवाई: नावानिशी २८ व इतर 30 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

खामगाव : पोळ्याच्या मिरवणुकीवर दगडफेकीनंतर पोलिस प्रशासन आणि आमदार आकाश फुंडकर यांच्या उद्भवलेल्या द्वंदाचे अखेर आज गुन्ह्यात रूपांतर झाले. लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आकाश फुंडकर यांनी जमाव जमवून रॅली काढल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आमदार फुंडकर यांच्यासह इतर ३२ जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

शनिवारी सायंकाळी पोळा फुटल्यानंतर दोन गटात झालेल्या वादातून पोळ्याच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. या दगडफेकीनंतर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याच्या निषेधार्थ आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी बंद पुकारला होता. या बंदच्या समर्थनार्थ आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात शहराच्या मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीत जमावबंदी आणि लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघनप्रकरणी आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सुमारे ३० ते ३२ जणांविरोधात भांदवि १८८, १३५ अन्वये २ सप्टेंबर रात्री उशीरा गुन्हा नोंदविला. 

हिंदुत्ववादी रॅलीत सहभागी झालेल्यावर गुन्हे

पूर्व परवानगी रॅली काढल्याप्रकरणी पोहेकॉ गजानन सुदाम सातव यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी भाजप जिल्हाध्यक्ष तथा खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, संजय भानुदास शिनगारे, अमोल अंधारे, राकेश राठोड, कृष्णासिंह ठाकूर, शेखर पुरोहित, पवन माळवंदे, संजय अवताडे, शुभम देशमुख, नरेंद्र रोहणकार, पवन गरड, राहुल जाधव, शंभु शर्मा,आशीष सुरेका, राहुल कळमकार, लखन करपे, गणेश सोनोने, विक्की दर्शनसिंह ठाकूर, कमलेश हवालिया, शरदचंद्र गायकी, आशीष लांडगे,  संतोष येवले, गजानन मुळीक, विक्की चौधरी, अशोक हट्टेल, संदीप राजपूत, धनंजय मोहिते, नानकसिंह चव्हाण आदींसह भाजपच्या ३० पदाधिकाऱ्यांसह विविध हिंदुत्वादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

सर्वांची माफी माग, नाही तर तुला…; पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालणाऱ्या नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

nirbhid swarajya

संत रविदास महाराज जयंती व माघ पोर्णिमेनिमीत्त रविदास महाराजांना अभिवादन

nirbhid swarajya

लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी होणार

nirbhid swarajya
error: Content is protected !!