आजी माजी आमदारांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप
खामगांव : खामगांव शहरात मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्री आणि परवानाधारक दारु दुकानांमधून विक्री केले जाणारे अवैधरित्या दारू संदर्भात तक्रारी सुरू आहे. अशातच आमदार आकाश फुंडकर आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी एकमेकांविरोधात आता बंड पुकारले आहे. अवैद्य दारूची विक्री बाबत तक्रार करणारे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्याच नातेवाईकांच्या होलसेल दारू दुकानाची योग्यरीत्या तपासणी करण्यात यावी अशी मागणी आमदार फुंडकर यांनी आज गृहमंत्र्यांकडे केल्याने आजी माजी आमदार समोरा समोर आले.
यावेळी आमदार फुंडकर यांची तक्रार खरी निघाल्यास मी राजकारण सोडेल अन्यथा आमदारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आवाहन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आमदार फुंडकर जेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार देत होते तेव्हा माजी आमदार सानंदा यांनी साहेब तक्रार खोटी निघाल्यास त्यावरही कारवाई करा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली.