मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा कोरोनावर मात करणारे औषध तयार केला असल्याचा दावा केला आहे. याआधी त्यांनी एक दावा केला होता. यावेळी तयार करण्यात आलेल्या औषधाने कोरोना रुग्ण हा केवळ 3 दिवसात पूर्णपणे बरा होतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.रामदेव बाबा यांनी कोरोनावर मात करण्यासाठी रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले आहेत. बाबा रामदेव यांनी अशी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. त्यांनी असा दावा केला आहे की, आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे.आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.याआधी रामदेव बाबांनी कोरोनिलला केवळ रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीचे बुस्टर म्हटले होते. आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP – WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे. पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की, 70 टक्के रुग्ण 3 दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील. ”आजचा दिवस ऐतिहासिक असून छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती आहे. एव्हिडन्स मेडिसीन्स म्हणून एव्हिडन्स आधारित संशोधन आहे की, वैद्यकीय क्षेत्रात भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल,” असं रामदेव बाबा यावेळी म्हणाले.