April 11, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा शेतकरी सामाजिक

आप्पाजी डेअरी प्रॉडक्टचा गांधी चौकात शुभारंभ

खामगाव : स्थानिक गांधी चौक भागात आप्पाजी डेअरी प्रॉडक्टचा नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर,अशोक सोनोने, सागर फुंडकर, मुन्ना पुरवार, वैभव डवरे, संजय शिनगारे, राम मिश्रा, कृष्णा ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील गोंधनापूर येथे आप्पाजी डेअरी फार्म सुरू करण्यात आलेला आहे. सदर डेअरी फार्ममध्ये होणार्‍या विविध पदार्थांचे अधिकृत विक्री सेंटर म्हणून स्थानिक गांधी चौक भागात आप्पाजी डेअरी प्रॉडक्टचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या शुभारंभप्रसंगी शहरातील अनेक गणमान्य व्यापारी, व्यावसायिक व प्रतिष्ठीत नागरिकांनी भेटी देवून शुभेच्छा दिल्या. शुध्दतेची हमी देत हे दालन सुरू करण्यात आले असून या ठिकाणी दूध, दही, ताक, तुप, खवा, पनीर आदी दुग्धजन्य पदार्थ मिळणार आहेत. तरी या शुध्दतापूर्ण सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रमणलाल भट्टड, सतिषआप्पा दुडे व दिलीप गुप्ता यांनी केले आहे.

Related posts

वडिलांनंतर तरुण मुलाचाही कोरोनाने मृत्यू

nirbhid swarajya

पंजाब सरकारच्या निषेधासाठी भाजपाची मुक निदर्शने

nirbhid swarajya

‘मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार ९७ टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले’

nirbhid swarajya
error: Content is protected !!