भारतातील सर्वात मोठी इंग्रजी संभाषण शिकवणारी शितल अकॅडमी संस्थेची जळगाव येथे राज्यस्तरीय मेगा इंग्लिश स्पीकिंग कॉम्पिटिशन उत्साहात संपन्न झाली स्पर्धेसाठी शितल अकॅडमीत शिक्षण घेणारे राज्यभरातील विद्यार्थी उपस्थित होते.या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला शितल अकॅडमी चे फाउंडर माननीय केतनजी प्रेमचंद शहा मुंबई हे उपस्थित होते, शितल अकॅडमी चे उपाध्यक्ष रवींद्र पाटील सर, लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक सुरज जी धाये आणि डॉक्टर नरेंद्र महाले, डॉक्टर संभाजीराजे पाटील पारोळा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक राजेंद्र राजपूत सर यांनी केले शिरपूर येथील शितल अकॅडमीची विद्यार्थिनी मीनल कुंभार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर पारोळा शितल अकॅडमी चा विद्यार्थी निखिल पाटील यांनी द्वितीय क्रमांक तसेच खामगाव शितल अकॅडमी चा विद्यार्थी आनंद लोखंडे यांनी तिसरा क्रमांक मिळवला कार्यक्रमात प्रारंभी उद्घाटक राजू मामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना संस्कार किती गरजेचे असतात याची जाणीव करून दिली आणि त्याचबरोबर शितल अकॅडमीचे कार्य विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले .शितल अकॅडमी चे फाउंडर केतन जी शहा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचे असेल तर इंग्रजीची भीती न बाळगता सातत्याने अभ्यास करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचे आवाहन केले राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीतेसाठी शितल अकॅडमी चे सर्व शाखाप्रमुख यांचे योगदान लाभले या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शितल अकॅडमी चा स्टॉप मोठ्या संख्येने उपस्थित होता.
previous post