January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा नागपुर बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेगांव

आनंदवन महारोगी सेवा समितीच्या वतीने दिव्यांग बांधवांना राशन किटचे वाटप

शेगांव : येथे शहर, तालुका तथा परीसरातील अत्यंत गरजु दिव्यांग बांधवांना महिनाभर पुरेल अशी राशन किट वाटप करण्यात आली. डॉ विकास बाबा आमटे यांच्या संकल्पनेतुन कोव्हीड-१९ या महामारीमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबाना सहकार्य करण्याच्या उदात्त हेतुने महाराष्ट्रभर राबवित असलेल्या मिशन आनंद सहयोग या सामाजिक मोहीमेअंतर्गत सावली सेवा प्रकल्पाच्या पुढाकारातुन सदर उपक्रम घेण्यात आला.

दिव्यांग बांधवांच्या समस्या तथा त्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव करतांना होणारी तारांबळ आणि त्याहुनही अधिक म्हणजे यादीमध्ये नाव नसलेल्या दिव्यांगाचे प्रश्न आणि अशा अनेक समस्यांचे निरासन करीत सावली परिवारातील सदस्य दिव्यांग प्रतिनिधि जयश्रीताई गीते श्री गजानन महाराज मतिमंद विद्यालयाचे प्राचार्य मा डॉ गजानन मुंढे सर मात्रुशक्ती संघटनेच्या पदाधिकारी महिला सदस्य तसेच आनंदवनातील मिशन आनंद सहयोग चे पदाधिकारी व आनंदवन मित्र परिवार शेगांव चे सदस्य या सर्वांनी भरपुर मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न केला.

सदर कार्यक्रमाला शेगांव शहराच्या नगराध्यक्षा मा सौ शकुंतलाबाई बुच, युवा नेते दिनेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिति होती. सदर कार्यक्रमाला विजयबाप्पु देशमुख, ज्ञानेश्वर साखरे,राजेश विभुते, नागेश देशमुख, अनंता देशमुख, पवन देशमुख, सचिन ठाकरे, संतोष ढगे, शंकर देशमुख, राजकुमार व्यास यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related posts

मराठी उच्च प्राथमिक शाळेत शालेय किचन गार्डन निर्मिती

nirbhid swarajya

चिखली मार्गावरील अपघातात नांदुरा येथील कंत्राटदार ठार

nirbhid swarajya

लॉकडाऊनला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा – प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने

nirbhid swarajya
error: Content is protected !!