शेगाव : बुद्धीचे देवता श्री गणपती बाप्पा चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.परंतू आजच्या मोबाइलयुगमुळे सर्वत्र लहानांपासुन तर मोठ्यांपर्यंत पर्यावरण तसेच आपली वाचन संस्कृती व संस्कार हरवत चालले आहे. त्याचे जतन आजच्या या युगात अती आवश्यक असुन यालाच आध्यात्मासोबत पर्यावरणरक्षण व संस्कारची जोड देत शेगाव येथील डॉ.अभय गोयनका यांनी आपल्या सक्ल्पनेतून आपल्या क्लिनिक मध्ये श्री गणेश स्थपनाकरत आगळी वेगळी संकल्पना रुजवत आध्यात्मासोबत पर्यावरणरक्षण व संस्कारांचे जतन केले.त्यात पर्यावरण पुरक शाडू मातीची श्री गणेश मुर्ती त्याच बरोबर पर्यावरण पुरक सजावट करित सोबत,भागवत गिता, ज्ञानेश्वरी,श्रीराम चरित् मानस व इतर अध्यात्मिक पुस्तके ठेवत आध्यातमाला पर्यावरण व संस्कारची जोड देत श्री गणेश स्थापना केली. आजच्या या युगात येणाऱ्या नविन पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल एवढे मात्र खरे..