April 16, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ संग्रामपूर

आदिवासी भागात डॉक्टर कमी पत्रकारिता करणाऱ्या एका सुपरीबाज पत्रकारांचा सुळसुळाट

भाग – १

संग्रामपुर : आदिवासी भागात बोगस डॉक्टर कमी आणि पत्रकारीता करणाऱ्या एका पत्रकारांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुठलेही काम न करता आदिवासी भागात बसून पत्रकार बैठकीत गुरगुरणार्या डॉक्टर कमी पत्रकार जास्त अश्याचा त्रास वाढला आहे.आदिवासी भागातील एका कोपऱ्यात ठाण मांडून बसलेल्या सुपारीबाज पत्रकारांला आदिवासी भागात सेटलमेंट करणारा डॉक्टर या नावाने प्रसिद्ध मिळाली आहे. याचे काम म्हणजे “मी नाही त्यातली कडी लावा आतली” या म्हणीला साजेसे आहे.जिल्ह्यातील काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना घेऊन हा डॉक्टर सेटलमेंट करत फिरतो आहे.सध्या एका माहिती अधिकार टाकून पैसे कमवणाऱ्याला सोबत घेऊन फिरताना हा डॉक्टर दिसत आहे.स्वतः दुसऱ्याच्या नावाने जिल्ह्यातील डॉक्टरांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे माहितीच्या अधिकार टाकून त्यांना सेटलमेंट करून देण्याच्या नावाने जिल्ह्याभरात धुमाकूळ घातला आहे. सर्वांचा विरोध डावलून त्याने मोठी दुकानदारी सुरू केली आहे. या पत्रकारामुळे त्या भागातील प्रशासनातील अधिकाऱ्यांची खूप मोठी डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात पत्रकारितेचा मोठा इतिहास आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गज पत्रकारांनी येथे चांगली पत्रकारिता केली आहे,आणि आजही अनेक जण चांगली पत्रकारिता करत आहेत. मात्र सर्व क्षेत्रात बोगसगिरी शिरल्यावर,पत्रकारिता कशी अपवाद ठरणार…सध्या बोगस पत्रकाराची चलती डॉक्टरांमधे सेटलमेंट जोकर म्हणुन सुरु झाली आहे.

काम कुठे करतो हे सांगत नाहीत, मात्र समोरच्याचे काम तमाम कसे करायाचे हे मात्र या सेटलमेंट करणाऱ्या डॉक्टर कमी पत्रकाराला चांगलेच माहित आहे. जिल्ह्यात या डॉक्टर सोबत काही मोजके चॅनेल्सचे फिरणारे पत्रकार सुद्धा सामील आहेत. त्यांना सुद्धा या सेटलमेंटची सवय लागली आहे. नवीन शिकार शोधण्यात यांचा दिवस निघतो. लवकरच या डॉक्टर व त्याच्या सोबत फिरणारे सुपरीबाज पत्रकारांचे बरेच पुरावे आमच्या हाथी लागले आहेत. जिल्ह्यात एखाद्या डॉक्टरची सेटलमेंट करायची असेल तर प्रिंट व टी व्ही मिडीयात बातम्या म्यानेज करून देतो,असे सांगाणारा हा भामटा एजेंट आहे. याची डॉक्टरकी चालत नसल्यामुळे हा सेटलमेंट पत्रकारिता करतोय. आणि अधिकाऱ्याची चाटुगिरी करण्यात हा भामटा डॉक्टर पत्रकार माहीर आहे. कोणत्याही कार्यक्रमात मोठं मोठ्या अधिकाऱ्यांच्या मागे पुढे फिरून सेटलमेंट कशी केव्हा कुठं करायची याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. आदिवासी भागात ह्याच्या तर भानगडबाज पत्रकार म्हणून नाव गाजल आहे. निर्भिड स्वराज्यने काल टाकलेल्या ब्रेकिंग बाबत आदिवासी भागातील त्या डॉक्टर कमी पत्रकार बद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.काही लोकांनी तर त्याने आदिवासी भागात क़ाय क़ाय भानगडी केल्या त्याच्या कागदपत्रा सहीत सर्व पाठवले आहे.या सुपारीबाज पत्रकाराची बंदोबस्त करण्याची मागणी त्याच्यापासून वैतागलेले प्रशासनाचे अधिकारीसुद्धा खाजगीमध्ये करताना दिसत आहेत. तो सेटलमेंट करणारा पहिले डॉक्टर होता की पत्रकार असा प्रश्न पडला आहे.या अश्या लोकांची लवकर दखल घेतली नाहीतर ती नुसती समाजासाठी मारक नाही तर, संपूर्ण लोकशाही साठी मारक ठरणार आहे.
तुर्तोस एवढे…..!

लवकरच भाग:-2

Related posts

भगवान बुद्ध जयंती निमित्त कँडल मार्च..

nirbhid swarajya

तहसीलदार साहेब तुमच्या राज्यात चालले तरी क़ाय…?

nirbhid swarajya

श्रीगुरुदेव नवदुर्गा मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

nirbhid swarajya
error: Content is protected !!