November 21, 2025
खामगाव बुलडाणा शिक्षण

आदिवासी बांधवांना कपडे व फराळ वाटप करून दिवाळी साजरी

प्रा. रामकृष्ण गुंजकर यांनी जपली मानवता

खामगाव- स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देखील सलाईबन येथील अदिवासी बांधवांना कपडे व फराळ वाटप करून अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.मागील अनेक वर्षांपासून स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामकृष्ण गुंजकर सर हे मानवाता जपत परिवारासह सातपुड्यातील अदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. यावर्षी देखील त्यांनी या उपक्रमात सातत्य राखत काल दि. 2 नोव्हेंबर रोजी सलाईबन येथे परिवारासह जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना कपडे फराळ वाटप केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर, सचिव प्रा. सुरेखा गुंजकर, तरुणाईचे मंजितसिंग शीख, उमाकांत कांडेकर, आदित्य गुंजकर, सानिका गुंजकर, दामू मिसाळ क आदींची उपस्थिती होती.

Related posts

स्वराज्य फाऊंडेशन च्या मुलींनी साजरी केली छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 450 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 72 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

प्रभू श्रीराम जन्मभुमी मंदिरासाठी सर्वांनी योगदान द्या :- ह भ प संजय महाराज पाचपोर

nirbhid swarajya
error: Content is protected !!