संग्रामपुर : एकीकडे राज्यासह देशात वाढत असलेल्या कोरोना बाबत स्वतः मुख्यमंत्री सह सगळेच जिल्हाधिकारी डोळ्यात तेल घालून काम करत असतांना बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी संग्रामपुर भागातील वैद्यकीय अधिकारी मात्र घरात बसूनच शेंगा फोडू लागले असल्याचे चित्र आहे. एकही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी मुक्कामाला राहत नसल्याने त्यांच्यावर आता प्रशासन कारवाई करणार का? हा खरा प्रश्न आहे कोरोना व्हायरस मुळे सगळीकडे अतिदक्षता घेतली जात आहे .अशावेळी सगळ्यात जास्त जबाबदारी असलेला आरोग्य विभाग मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी संग्रामपुर भागात आहे .बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी संग्रामपुर भागात असलेल्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात बहुतांश वैद्यकीय अधिकारी हे घरी बसूनच कारभार हाकत आहेत .कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये ,मंदिर मस्जिद यामध्ये गर्दी टाळण्याचे आदेश देत या व्हायरस पासून बचाव करण्यावर प्रशासन भर देत आहे .
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत की आरोग्यमंत्री राजेश टोपे हे डोळ्यात तेल घालून यंत्रणेला कामाला लावत आहेत .बुलडाणाचे जिल्हाधिकारी हे दररोज किमान चार ते पाच बैठका घेऊन कामाचा आढावा घेत आहेत .
मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश वैद्यकीय अधिकारी हे ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात मुक्कामाला राहून परिस्थिती वर लक्ष ठेवण्याऐवजी घरी बसून शेंगा फोडत आहेत .अनेक वैद्यकीय अधिकारी हे आपल्या पुढील शिक्षणाच्या तयारीत गुंतले आहेत तर तालुका वैद्यकीय अधिकारी हे नागपुरला जाने येणे करीत असल्याचं खात्रीलायक आहे..
मांजर डोळे झाकून दूध पिते ?
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा मॅडम..! आपण एकीकडे डोळ्यात तेल घालून यंत्रणेला कामाला लावत असताना ज्यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे ते अधिकारी जर अशा पद्धतीने काम करणार असतील तर आरोग्य यंत्रणा कशी काम करणार आणि या व्हायरस ला आटोक्यात कसे आणणार हा प्रश्नच आहे .जिल्हा आरोग्य अधिकारी कांबळे हे निवृत्तिजवळ आहेत,त्यांच्याकडून जिल्ह्याला मोठी अपेक्षा आहे,मात्र ते मुख्यालयी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत .