खामगाव : खामगाव मतदारसंघातील आदर्श ग्राम असलेल्या कोंटी गावाला नवीन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी प्रथमच भेट देऊन पाहणी करून कामांची प्रशंसा केली.नवनियुक्त जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी प्रशासनासह खामगाव तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या कोंटी गावाला भेट देऊन गावात झालेल्या तसेच शिवारात झालेल्या विविध विकास कामाची पाहणी केली. आदर्श ग्राम, संत तुकाराम वन ग्राम , महात्मा गांधी तंटामुक्त , संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व स्मार्ट ग्राम असे विविध जिल्हा, विभागीय, व राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या कोंटी गावाची व शिवराची पाहणी यावेळी जिल्हाधिकारी यस राममूर्ती व त्यांच्या चमूने केली. गावात झालेल्या विविध विकास कामांसोबत त्यांनी जलसंधारण कामे, लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, ज्ञानगंगा शेतकरी गटांच्या कुक्कुटपालन प्रकल्पांच्या भेटी घेऊन पाहणी केली.तसेच बोन्डअळी मुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची सुद्धा त्यांनी पाहणी केली . या पाहणीत जिल्हाधिकारी एस..राममूर्ती यांनी सर्व कामांची खूप प्रशंसा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांचेसह जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी श्री पटेल, तालुका कृषी अधिकारी श्री गिरी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा दुष्काळ निवारण समिती अध्यक्ष शांताराम बोधे, भाजप किसान आघाडी अध्यक्ष संजय ठोंबरे, तलाठी श्री खान, ग्रामसेवक श्री डवंगे, कृषी सहाय्यक सौ रहाटे, कृषी आत्मा योजना विभागाचे श्री पडोळ, श्री नागे, कृषी पर्यवेक्षक श्री सोनोने , कोंटी सरपंच सौ इंदूताई ठोंबरे यांची उपस्थिती होती.
लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर तसेच खामगाव मतदार संघाचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष अँड आकाश फुंडकर यांचे माध्यमातून कोंटी गावाचा सर्वांगीण विकास झाला,आमच्या गावाला आजवर राज्य, राज्याबाहेरून चमू भेटी देत आहेत.आमच्या गावचं नाव स्व.भाऊसाहेब यांच्यामुळे लौकिक झालेलं आहे.यापुढे आता हेच काम आमदार अँड आकाश फुंडकर यांचे माध्यमातून पुढे नेऊ असे सौ इंदूताई संजय ठोंबरे सरपंच ग्राम कोंटी यांनी सांगितले.