खामगांव : आयुष्याची सुरुवात होते ती एका मोठया शर्यतीतून,ती शर्यत असते आईच्या गर्भात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची,खूप मोठी लढाई असते ती जिंकलो म्हणजे तिच्या गर्भात नऊ महिने प्रवास आणि नंतर बाहेर येण्याची घाई,स्वतःला आईपासून आता वेगळं करायचं असत म्हणून धडपड,, पण तिच्या मरणयातना नेहमी आठवत रहाव्या,ह्या शर्यतीत आपलं स्थान निर्माण करणं ही सगळ्यात मोठी शर्यत जिंकणे आता लहानाचे मोठे होत असताना तीच बोट तीच तुम्ही आजारी असतानाच जागरण,,जरा ताप वाढला तर डोळ्यात गरगर पाणी उभं रहात हे आठवा मोठे होतो,स्वतःच्या पायावर उभे रहाण्याचा प्रयत्न ,,तिची देवाकडे तुमच्यासाठीची धाव आठवा,,,, ज्यावेळी मोठे होता त्यावेळी जस वादळ येईल तस उपणायच ,,स्वप्न बघायची ती पूर्ण करण्यासाठी मग मार्ग कसा आहे ह्याचा विचार करू नका,,,जितके मोठे स्वप्न तितकी मोठी परीक्षा,,, मुंगीपासून जिंकणं शिका,,अडचणी कुणाच्या आयुष्यात नाहीत आणि हो अडचणी आहेत म्हणून मार्ग काढण्याची ताकद मनगटात उतरते,,,स्वतःच्या कामात कमी पडू नका म्हणजे कुणापुढे झुकावे लागणार नाही,,काम तर करायचंच आहे ना मग मनातून करा डोक्यातून कराल तर नक्कीच आजारपण लागतील,,,राग आणि चिडचिड म्हणजे कामातून माघार असते,,तुमचा राग आणि चिडचिड ह्यातून तुम्ही आमंत्रण देता ते थायरॉईड,,शुगर आणि ब्लड प्रेशर सारख्या आजारांना ,,,अरे राग येतो म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या मेंदूने काम करत आहात ना ,, स्वतःच्या मेंदूला दुसऱ्याच्या हातात दिल तर तुमचं स्वतःच अस्तित्व संपुष्टात येणार आणि राहील तो डोक्याला ताप,,,,प्रेमाने प्रेम मिळते ,,प्रेमाने जग जिंकता येत,,प्रेमाने राक्षसी स्वभावसुद्धा बदलता येतो फक्त तुमची वाणी,, तुमचे कर्तव्य ह्यात चुकू नका,,,,ताणतणाव,,आजारपण ,,उतारचढाव येतच राहणार पण सगळ्या परिस्थितीत तुम्ही कसे खंबीर राहणार ,,,बस स्वतःशी प्रामाणिक रहा वाट मोकळी होत राहील,,
तुमची केलेली चूक तुम्हाला ,,तुमच्या मनाला आतपर्यंत कोरत नेते ,,,मन खायला लागते मग चुकायच नाही ,,सरळ सरळ आयुष्य आहे यार येणाऱ्या वादळावर झुंझार बनून तुटून पडा ,,आयुष्य पुन्हा नाही जिंकायची सवय लावा,,,वाईट घडले तरी चांगल्यासाठी म्हणून पुढे चालत रहा,,, प्रत्येकाची वेळ ,घटिका ,स्थळ आणि मृत्यू ठरलेला आहे तो भगवंताला नाही चुकलं,,,,जितकं जगू तितक स्वाभिमानाणे ह्याचा अभिमान बाळगा ,,आपल्या टेंशन्स ला आपल्यापेक्षा मोठं करू नका,,हा निसर्ग तुमचं प्रत्येक गाऱ्हाणं ऐकत असतो,,,तसाच तो तुमचेच शब्द तुमच्याकडे पाठवत असतो,,,,मग ह्या निसर्गाशी चांगलंच बोलत रहा तो जस बोलाल त्याला तथास्तु करत असतो,,,,सांगा त्याला माझं आयुष्य ही तुझी देन आहे,,,माझं आयुष्य हे तुझे उपकार आहेत,,चांगल्या आणि सकारात्मक विचारांचा मी खजिना आहे आणि तो नकारात्मक लोकांना सकारात्मक करू शकेल इतकी ताकद माझ्यात आहे,,,मी सगळं करू शकतो ,,तुझ्या आशिर्वादाने मी चिरकाल तरुण असणार बस सोबत रहा ज्या कामासाठी माझा जन्म झाला तो सत्कारणी लाव ,,तुझी काम करून घे,,,,,आत्महत्या हा शेवट नाही ,,,,, स्वतःच्या आयुष्याला किमती बनवायचं असेल तर येईल ते काम करण्यासाठी मी तयार आहे कारण शरीर निरोगी असणे हे किती मोठी संपत्ती आहे हे रोगी व्यक्ती सांगू शकतो,,,,संघर्ष आणि शत्रू तुमच्या जीवनात मोठा वाटा असतात ज्यामुळे तुम्ही खंबीर बनता,,, तुमच्यातील ताकद कळते ,,,स्वतःच्या कामात चुकू नका अन कुणापुढे झुकू नका,,,अरे गडावरून उडी मारून मरण्यापेक्षा चार हात करून जिंकण्याची तयारी ठेवा ,,,आयुष्य पुन्हा नाही,,जगा आणि जगू द्या ,,जगून घ्या ,,,,सुंदर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला की सगळं सोपं होतं,,,,,,ही ताकद आपल्या मनात आहे आणि मन कुठे आहे,,,, ही ऊर्जा आहे ती कायम तरुण ठेवा जो आपल्या मार्गात येईल त्याला बदलण्याचा प्रयत्न करा ,,,नक्कीच बदल घडवू शकतो,,,,आत्मा तुमचा त्याची हत्या करण्यापूर्वी पुन्हा आईच्या गर्भपासून सुरुवात आठवा,,, तिचे अश्रू आठवा ,,,विचार करून मार्ग काढा विजय तुमचाच आहे.
राजश्री पाटील
खामगांव