खामगाव : विद्यार्थ्यांना न्यायरूपी प्रकाश देण्यासाठी ईशिता वानखडे हिने उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स मध्ये एमएससी केले. खामगावच्या जी.एस. कॉलेजमधून बीएससी चे शिक्षण पूर्ण करून या कॉलेजमध्ये कंत्राटी पद्धतीने असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्य सुरू केले. परंतु विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यापूर्वी ईशिताने अखेरचा निरोप घेतला. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे व माझी ऑक्सिजन लेव्हल कमी आहे. असे स्टेटस व्हाट्सएपला ईशिता ठेवले होते. मात्र नियतीला काही वेगळेच कबुल होते. २९ वर्षीय प्राध्यापिकेच्या निधनाची बातमी आल्याने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढदिवसाच्या दिवशीच ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने ईशिता ने अखेरचा श्वास घेतला. येथील गो.से. महाविद्यालयात कॉम्प्युटर विभागातील प्राध्यापिका ईशिता उमेश वानखडे हिच्या आई वडिलांची प्रकृती काही दिवसांपासून अत्यवस्थ झाल्याने ईशिता त्यांची सेवा करत होती.तसेच त्यांच्या सर्व वैद्यकीय उपचारासाठी लक्ष देत होती. याच दरम्यान तिला कधी कोरोना संसर्गाने हेरले हे तिला कळलंच नाहीये. ईशिता हिला काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास सुरू होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली. दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील सामान्य रूग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची १४ एप्रील रोजी त्यांच्या वाढदिवशी ऑक्सिजन लेव्हल खालावली होती. याबाबत त्यांनी व्हॉट्सॲपवर “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे व माझी ऑक्सिजन लेव्हलही फार कमी झाली आहे.” असा भावनीक मॅसेज स्टेटसवर ठेवला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी १५ एप्रीलला त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला. प्रा. ईशिता वानखडे यांचे वय फक्त २९ वर्ष इतकेच होते. इतक्या कमी वयात त्यांचा कोरोनाने बळी गेल्याने शिक्षक व प्राध्यापक वर्गात खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या दुर्देवी निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. शहरात ऑक्सिजन बेडची कमतरता निर्माण झाली आहे. त्याचाच हे एक जीवंत उदाहरण आहे. शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता भासत आहे. मात्र वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागत असल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. याकडे आरोग्य प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचारासाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेमडिसवीर इंजेक्शनचाही तुटवडा असल्याने अनेक रूग्णांना योग्य तो उपचार मिळत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रेमडिसवीर इंजेक्शनचाही पुरवठा करावा अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. ईशिताच्या या दुर्देवी निधनाने त्यांच्या कुटूंबावर शोककळा पसरली आहे. कोरोना संसर्गाने विदारक स्वरूप धारण केले असून कोरोना संसर्गीत रूग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्याचे औषध व अन्न प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात तसेच जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही आहे. मात्र एकीकडे सामान्य रुग्णालयात कोरोना झालेल्यांचे प्राण हे ऑक्सिजन न मिळाल्याने झाले आहेत का ? असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे. सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेत नसून ऑक्सिजन पुरवठा बाबत ठोस पावले उचलावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. अलीकडच्या काळात म्हणजेच कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये फक्त वयस्कर लोकांचे मृत्यू होत होते. मात्र आता कोरोनाने आपल्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होताना दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे, मात्र प्रशासन याकडे कुठल्याही प्रकारे गांभीर्याने दखल घेत नसल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. काल सुद्धा जिल्ह्यामधे १०१८ पेशंट निघाले असून मृतांची संख्या ही ६ आहे. जिल्ह्यात नागरिकांची ठीक ठिकाणी अश्या चर्चा सुरू आहेत की, जिल्हाधिकारी सुद्धा याबाबत कुठलेही कडक पावले उचलताना दिसत नाही आहे. स्थानिक नगरपालिका प्रशासन सुद्धा आपले काम फक्त कागदोपत्रीच करत असताना दिसत आहे. आणि या सर्वांमध्ये फक्त राबताना दिसत आहे रस्त्यावर उभे असलेले पोलीस प्रशासन जे आपली ड्युटी चोख बजावताना दिसून येत आहे. शहरामध्ये लॉकडाऊन आहे की नाही ? आणि आहे तर कसे आहेत नियम ? याबाबतचा संभ्रम लोकांमध्ये दिसून येत आहे, त्यामुळे गावामध्ये रोजच मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे बैठका घेऊन नवनवीन आदेश प्रशासनाला देत आहे मात्र प्रशासनाकडून याची कुठलीच अंमलबजावणी होताना दिसून येत नाही आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अजून कीती बळी जातील ? हे आता सरकार सांगू शकेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दोन ते तीन दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतलेल्या बैठकीत सांगितले की लॉकडाऊन चे नियम पाळले गेले नाही तर जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. आणि याच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जर लोकांचे जीव गेले तर याला जबाबदार कोण ? असा सुद्धा एक प्रश्न सामान्य नागरिकांकडून प्रशासनाला विचारला जात आहे. जिल्ह्यातील वाढता कुराणाच्या आकड्याला जबाबदार कोण प्रशासन की पालकमंत्री ? अशी सुद्धा चर्चा नागरिक आता करू लागली आहे. लवकरच नागरिकांच्या या सर्व बाबींकडे जर गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही तर नातेवाईकांच्या संयमाचा बांध हा केव्हाही फुटेल एवढे मात्र खरे…..! तसेच जिल्ह्यात जर कोरोना पेशंटचा आकडा वाढत राहिला तर जिल्हा कडक लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याची दखल सुद्धा बिनधास्त फिरणाऱ्या नागरिकांनी घेतली पाहिजे….!
previous post