January 6, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

आणिबाणी विरोधात लढणाऱ्या सत्याग्रहांमुळेच देशाला आज चांगले दिवस: आ.अँड फुंडकर

भाजपच्या वतीने काळा दिवस साजरा

खामगाव : देशहितासाठी काँग्रेसने १९७५ साली लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्या देशभक्त सत्याग्रहीमुळेच आज देशाला चांगले दिवस आल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांनी केले. २५ जुन १९७५ रोजी देशात मीसाबंदी आणिबाणी इंदिरा गांधी सरकारने जाहीर केली. इतिहासात या दिवसाची काळ्या अक्षराने नोंद करण्यात आली. भाजपच्या वतीने हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे आयोजित कार्यक्रमात आमदार अँड आकाश फुंडकर बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख होते तर प्रमुख उपस्थितीत आमदार अँड आकाश फुंडकर यांचेसह आणिबाणी काळात तुरुंगवास भोगलेले रामेश्वरकाका घोराळे, ओंकारअप्पा तोडकर, नगराध्यक्षा सौ अनिताताई डवरे, भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी आणिबाणी काळात लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत तुरुंगवास भोगलेले रामेश्वरकाका घोराळे यांनी त्या काळ्या दिवसांचा विस्तृतपणे घटनाक्रम कथित केला. त्यानंतर यावेळी खामगाव मधील ज्या सत्याग्रह करणाऱ्यांनी तुरुंगवास भोगला अश्या हयात असलेल्या देशभक्तांचे तसेच जे नाहीत अश्यांच्या परिवारातील सदस्यांचा आमदार अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते शाल, मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना आमदार अँड आकाश फुंडकर यांनी लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांनी तुरुंगात भोगलेल्या व आणिबाणी काळातील सांगितलेल्या घटनांचा उलगडा केला. काँग्रेस सरकारने देशावर ७० वर्षे राज्य केले, त्यांनी देशाला देशोधडीला आणले. या विरोधात अनेक देशभक्त संघटना, पक्ष काँग्रेस सरकारच्या देशविरोधी नीती विरोधात रस्त्यावर आंदोलन सुरू केले. सरकार धोक्यात येईल या भीतीने इंदिरा गांधींनी यांनी देशात २५ जून १९७५ रोजी अघोषित आणिबाणी लादली. यापूर्वी केवळ भारत चीन, पाकिस्तान युद्धावेळी देशात लागली होती. परंतु १९७५ ची आणिबाणी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्यापही काँग्रेस पक्ष सांगू शकलेली नाही. त्या काळात सरकार विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला तुरुंगात मिसाबंदी कायद्याच्या खाली तुरुंगात टाकण्यात आले. त्यांचेवर खुप अत्याचार करण्यात आले. देशातील जनसामान्यांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले. खऱ्या राष्ट्रभक्त लोकांना अतिरेकी म्हणून तुरुंगात टाकून त्रास देण्यात आला. अश्या काळात लाखो तुरुंगातील बाहेर असलेल्या भूमिगत देशभक्तांनी सुद्धा मोलाची कामगिरी केली व आणीबाणीच्या विरोधात लढा सुरूच ठेवला. केवळ सत्ता जाईल या विचाराने इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणी लावून देशातील नागरिकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले. नागरिकांवर भयंकर अत्याचार केले. परंतु इंदिरा गांधी सरकारला अखेर देशभक्त सत्याग्रहाच्या समोर झुकावे लागले. आणिबाणी उठविल्यावर देशात १९७७ मध्ये पहिल्यांदाच गैर काँग्रेस सरकार अस्तित्वात आली. तो काळा इतिहास नव्या पिढीला माहीत असावा यासाठी दरवर्षी काळा दिवस म्हणून भाजपच्या वतीने साजरा केला जात आहे. त्यावेळी ज्या देशभक्तांनी तुरुंगवास भोगला तसेच ज्यांनी भूमिगत राहून काम केले अश्यामुळेच आज आपण खरे चांगले दिवस पाहत असून देशाला बळकट म्हणून संपूर्ण जगात पाहत आहोत, अश्याची प्रेरणा घेऊन आपण असेच लढत राहलो तर ३७० रद्द, राम मंदिर, ट्रिपल तलाख नंतर आता समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा अश्या ऐतिहासिक मुद्दे देशहितासाठी नक्कीच घेऊन असा आशावाद यावेळी आमदार अँड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला भाजप शहर, तालुका पदाधिकारी, जि व , प स सदस्य , न प सभापती, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन शहर महामंत्री जितेंद्र पुरोहित तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस शांताराम बोधे यांनी केले.

Related posts

जिल्हयात आज प्राप्त ०४ कोरोना अहवाल निगेटिव्ह ; ३ पॉझिटिव

nirbhid swarajya

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा:कार्यकारी अभियंता प्रवीण पुंडकर

nirbhid swarajya

बोरी अडगाव ग्राम सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनलचा विजय

nirbhid swarajya
error: Content is protected !!