January 1, 2025
खामगाव

आठवडी बाजार नूतनीकरणाचे काम बंद करण्याची रहिवाशी व व्यावसायिकांची मागणी

खामगाव : स्थानिक आठवडी बाजारात नगर परिषद मार्फत आठवडी बाजार नूतनीकरण व शॉपिंग कॉप्लेक्स उभारणार येणार असल्याचे समजते याबाबत असे की नगर परिषद खामगाव च्या वतीने आठवडी बाजार अंदाचे 8 कोटी रुपये खर्च करून बारामती येथील आठवडी बाजाराप्रमाणेच खामगाव येथील आठवडी बाजार नूतनीकरण व शॉपिंग कॉप्लेक्स उभारणार आहे . या नूतनीकरण व शॉपिंग कॉप्लेक्स बांधतांना येथील रहिवासी हे अंदाजे 80 ते 90 वर्षांपासून राहत आहे आणि त्याठिकाणी राहुन छोटासा व्यवसाय करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत तसेच व्यावसायिक हे जवळपास 80 ते 90 वर्षांपासून त्याठिकाणी राहून आपला छोटा – मोठा व्यवसाय करत आहेत. येथील व्यवसायिकांजवळ असंख्य नोकर वर्ग काम करीत आहे त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे .
     वास्तविक पाहता खामगाव सारख्या छोट्याशा शहरात एवढा मोठा बाजार बांधण्याची आवश्यकता नाही कारण  बुलडाणा जिल्ह्याच्या ठिकाणी आठवडी बाजार बांधलेला नाही त्याचप्रमाणे अकोला सारख्या महानगरपालिकेत सुद्धा अशा प्रकारचा आठवडी बाजार नाही  मग खामगाव सारख्या ठिकाणी एवढा मोठा आठवडी बाजार कशाला ? आठवडी बाजार निर्मिती करतांना 40 फुटाचा एवढा मोठा रस्ता कशाला ? बाजाराच्या आत मध्ये 30 फुटाचा रस्ता कशाला ? आजची खामगाव शहराची परिस्थिती पाहता शहरात ठिकठिकाणी भाजीविक्रेते रस्त्याच्या बाजूला छोटी दुकान लावुन व्यवसाय करीत आहे , त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात हातगाडी , मोटारसायकल , सायकल वर भाजीपाला विक्रेते भाजीपाला विकत असतात आणि आजच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीजवळ वेळ कमी आहे त्याला जवळ जी वस्तु उपलब्ध आहे ती खरेदी करतात अशा परिस्थितीत खामगाव शहरात एवढा मोठा आठवडी बाजार बांधण्याची आवश्यकता नाही त्यामुळे नूतनीकरनाच्या कामाला लवकरात लवकर स्थगिती देऊन काम बंद करावे या मागणीकडे नगर परिषद , लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्यकर्ते व जनप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी येथील रहिवाशी  व्यावसायिक व कामगार वर्ग करीत आहे.

Related posts

कोरोनाला हरवून जवान परतला कर्तव्‍यावर

nirbhid swarajya

लॉकडाऊन मुळे अडकलेल्यांना परत आणायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढाकार

nirbhid swarajya

पक्ष,बॅनर नसले तरी माझ्याजवळ जिल्ह्याच्या जनतेच्या विकासाचा विचार – संदीप शेळके

nirbhid swarajya
error: Content is protected !!