January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

आज शांतता समितिची बैठक

खामगांव : कोरना चा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे गणेश उत्सव याप्रमाणे नवरात्र,जगदंबा उत्सव,दसरा,ईद,व दिवाळी ही साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवरात्री उत्सव व अन्य सण हे साधेपणाने साजरा केला जाणार आहे. याच अनुषंगाने आज 15 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या उपस्थितीत स्थानिक महात्मा गांधी सभागृहांमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात ७०० हुन अधिक नवदुर्गा उत्सव मंडळ आहेत. हे सर्व मंडळ नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात. परंतु जिल्ह्यावर कोरोनाचे संकट असल्याने आतापर्यंत जेवढे सार्वजनिक सण-उत्सव पार पडले ते सर्व अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आले. यामुळे प्रामुख्याने गणेशोत्सवाचा समावेश आहे.त्याच धर्तीवर आता नवरात्री उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. येत्या 17 ऑक्टोंबर पासून या उत्सवाला सुरुवात होणार आहे. यासाठी विविध नियम व अटींच्या चौकटीत राहून नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन सूचना शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे या उत्सवात यंदा गरबा-दांडिया संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.त्याऐवजी आरोग्य विषयी शिबिर आयोजित करावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्व खामगाव वासियांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया,उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, नगराध्यक्ष अनिताताई डवरे,शहर ग्रामीण व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे तीनही ठाणेदार हे उपस्थित राहणार आहे.तसेच शहरातील शांतता समितीचे सदस्य व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Related posts

खामगाव फार्मर्स,ट्रेडर्स आणि इंडस्ट्रियलिस्ट मार्फत खाद्यान्ना वरील जीएसटी ला विरोध

nirbhid swarajya

ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंचांचीच नेमणुक करावी – सरपंच संघटनेची मागणी

nirbhid swarajya

अखिल भारतीय कलाल महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश चौकसे यांची नियुक्ती …

nirbhid swarajya
error: Content is protected !!