December 14, 2025
आरोग्य जिल्हा

आज प्राप्त ४८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर दोन पॉझीटीव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले ५० अहवाल आज प्राप्त झाले असून त्यापैकी ४८ अहवाल निगेटीव्ह व दोन अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये शेगांव येथील ३२ वर्षीय महिला व आव्हा, ता. मोताळा येथील २२ तरूण आहे. आतापर्यंत ७९६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ३२ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत २४ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २४ आहे. सध्या रूग्णालयात पाच रूग्ण कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
तसेच आज २० मे रोजी ५० अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ९० आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ७९६ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

ऑनलाइन उडविले खात्यातून 11 लाख…

nirbhid swarajya

“जागतिक चिमणी दिवस” निमीत्य़ खोपे व पाण्याचे भांडे उपलब्ध

nirbhid swarajya

चक्क पतीनेच लावले पत्नीचे सार्वजनिक ठिकाणी पोस्टर

nirbhid swarajya
error: Content is protected !!