November 20, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

आज जिल्ह्यात प्राप्त 148 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 10 पॉझिटिव्ह

आज 18 रूग्णांची कोरोनावर मात, आतापर्यंत 270 रूग्ण बरे


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 158 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 148 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 10 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 6 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 49 तर रॅपिड टेस्टमधील 99 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 148 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह अहवालामध्ये चिखली येथील 28 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरूष, लक्ष्मी चौक मलकापूर येथील 47 वर्षीय पुरूष, माळीपुरा चिखली येथील 26 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल खामगांव येथील 25 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 51 वर्षीय महिला व 39 वर्षीय पुरूष, हिवरखेड ता. लोणार येथील 18 वर्षीय तरूणी, नांदुरा येथील 8 वर्षीय मुलगा व 30 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालांचा समावेश आहे.
तसेच आज 18 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये घासलेटपुरा नांदुरा येथील 45 वर्षीय पुरूष, सिव्हील लाईन खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, आळसणा ता. शेगांव येथील 55, 38 व 30 वर्षीय महिला, 12 व 6 वर्षीय मुलगा, 10,8, 3 व 2 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय युवक, 30 वर्षीय पुरूष, ताज नगर नांदुरा येथील 62 वर्षीय पुरूष, जामा मस्जीदजवळ मेहकर येथील 15 वर्षीय दोन युवती, 9 वर्षीय मुलगा आणि डिएसडी बुलडाणा येथील 44 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 4726 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 270 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 270 आहे. आज रोजी 72 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 4726 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 492 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 270 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 205 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 17 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

सोयाबीन , कपाशीवर उंट अळीचा प्रादुर्भाव वाढला कृषी सहाय्यक यांची पाहणी

nirbhid swarajya

‘लोणार’चा विषय पूर्वीपासूनच मनात; मुख्यमंत्री रमले आठवणीत

nirbhid swarajya

वरवट बकाल येथील ज्वेलर्स ची 3 दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी..चोरट्यांचे तामगाव पोलीसांपूढे आव्हान !

nirbhid swarajya
error: Content is protected !!