April 11, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव शेतकरी

आज आवतन घ्या, उद्या जेवायला या..”! पोळ्याच्या निमित्ताने बैलांची खांद शेकणी; आज बैलांचे होणार पूजन

खामगाव: शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा हा अवघ्या एका दिवसावर आला आहे. ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला खूप महत्त्व आहे. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय. त्यानिमित्ताने आज गुरुवार २५ ऑगस्ट रोजी बैलांची खांद शेकणी करून “आज आवतन घ्या, उद्या जेवायला या”, अशी साद शेतकरी बैलांना घालून आमंत्रण देणार आहेत.

आज संध्याकाळी बैलांची तूप व हळदीने खांदशेकणी करण्यात येणार आहे. वर्षभर बैलांच्या खांद्यावर ओझे असते. पोळ्याच्या निमित्ताने बैलांच्या खांद्याला तूप आणि हळद लावून शेकण्यात येते. पोळ्याचा पहिला दिवस म्हणजे वाडबैलाचा. यादिवशी मातीच्या बैलांची व घरच्या बैलजोडीची खांद शेकून महादेवाचे गाणे म्हणत हरहर महादेवाचा गजर करीत पूजा केली जाते. दरम्यान पोळा सणाच्या पार्श्‍वभूमीवर बैलांना लागणारे विविध सजावट साहित्यांची दुकाने खामगाव येथील बाजारपेठेत सजू लागली आहे. शेतकरी मोठ्या आवडीने दुकानात जाऊन आपल्या लाडक्‍या बैलजोडीला शोभेल, असे साहित्याची पारख करून खरेदी करू लागला आहे.उदया बैलांना पूजेचा मानबैलपोळा सण २६ ऑगस्ट रोजी साजरा होनार आहे. यादिवशी सायंकाळी परिसरातील सर्व बैलांना हनुमान मंदिरासमोर एकत्र आणले जाते.सर्वप्रथम मानाच्या बैलांचे आगमन झाल्यानंतर सर्व शेतकरी आपापल्या बैलांना वेशीतून पळवत नेतात.नंतर हनुमान मंदिरास प्रदक्षिणा मारून बैलांना घरी नेले जाते. काही शेतकरी बैलांची वाजत-गाजत गावातून मिरवणूक काढतात.

Related posts

एस टी बस व ४०७ ची समोरा समोर धडक ; एकाचा मृत्यु तर १६ जखमी

nirbhid swarajya

खामगाव शहर पोस्टचे ५ अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 343 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 73 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!