खामगाव:शेजारच्या शेतातील ऊसाला लागलेली आग विझवितांना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी मलकापूर तालुक्यातील घिणीं शिवारात घडली.घिर्णी येथील शेतकरी सुखदेव जगदेव वाघमारे हे आज दुपारदरम्यान स्वतःच्या शेतातील गव्हाचा पालापाचोळा पेटवित होते.यावेळी अचानक हवेमुळे चिंगारी उडून त्यांच्या शेताच्या शेजारी असलेल्या सुभाष भोपळे यांच्या शेतातील ऊसाला आग लागली.यामुळे वाघमारे हे घाबरुन गेले.त्यांनी कुठलाही विचार न करता आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र यावेळी गुदमरुन व होरपळून सुखदेव वाघमारे यांचा मृत्यू झाला , ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सदर शेतावर गर्दी केली होती . या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे