खामगांव : घाटपुरी रोडवरिल चोपड़े यांच्या मळ्या जवळ असलेल्या हॉटेल ला आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.येथील घाटपुरी रोडवरील चोपड़े यांच्या मळ्या जवळ श्रीमती रंजना काशिनाथ कुऱ्हे रा.पाण्याच्या टाकी जवळ घाटपुरी या ७ वर्षापासून तेथे चहा नाश्ताचा व्यवसाय करतात. तर आज रात्रि ३ वाजताच्या सुमारास हॉटेल मागील शेडला अचानक आग लागली होती. रेती वाहतूक करणाऱ्यांना आग दिसताच त्यांनी पाणी टाकून आग विजवण्यात आली होती. घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी पोचले होते. या आगिच्या घटनेमध्ये हॉटेल मधील नेट, ताट्या, फ्लेक्स, बोर्ड, लाकड़ी बाकडे अंदाजे ५ ते ६ हजार रुपये नुकसान झाले असून हॉटेल चालक यांना कुणावरही संशय नसल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये हॉटेल जळाल्याची नोंद करण्यात आली आहे.
previous post