October 6, 2025
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर मोताळा राजकीय लोणार विदर्भ शेगांव संग्रामपूर सिंदखेड राजा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युती संदर्भात चर्चेसाठी भाजप शिंदे गटाची संयुक्त बैठक…

शेगाव: खासदार आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त बैठक.शेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम भवन येथे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये झालेल्या चर्चे संदर्भात खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पत्रकारांची चर्चा करताना सांगितले की आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे घटना सोबत युती संदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली त्याबाबतचा संपूर्ण अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती आमदार व खासदार यांनी दिली या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार एडवोकेट आकाश फुंडकर आमदार सौ श्वेता ताई महाले आमदार संजय गायकवाड आमदार डॉक्टर संजय रायमुलकर माजी आमदार चैनसुख संचेती माजी आमदार विजयराज शिंदे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नंदू अग्रवाल संतोष देशमुख शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांताराम दाने त्यांच्यासह भाजप व शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

मेरा खुर्द येथील घटनेचे चिखलीत तीव्र पडसाद, तणावपूर्ण शांतता

nirbhid swarajya

जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या समोर उद्या संगणकपरिचालकाचे निषेध आंदोलन.

nirbhid swarajya

अटाळी येथील १५० शेतकऱ्यांच्या समस्यांचे पोखरा अधिकाऱ्यांनी केले निराकरण

nirbhid swarajya
error: Content is protected !!