युरिया खताचा सुरू होता काळा बाजार
खामगाव : युरीया खताचा साठा करुन काळाबाजार करणार्या आंबेटाकळी येथील कृषी केंद्रावर आज तालुका कृषी अधिकारी गिरी यांनी छापा मारला. याप्रकरणी सदर कृषी केंद्र चालकाला नोटीस बजावली असल्याची माहिती गिरी यांनी दिली.
तालुक्यातील आंबेटाकळी येथील आशिर्वाद कृषी केंद्रावर युरीया खताचा काळाबाजार सुरु असल्याची तसेच 265 रु.चा युरीया 400 रु.बॅगप्रमाणे विक्री करुन शेतकर्याची लुट सुरु असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी गिरी यांना प्राप्त झाली होती. यावरुन गिरी यांनी आज दुपारी सदर कृषी केंद्रावर जावून चौकशी केली.यावेळी याठिकाणी गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणावर युरीया खताचा साठा दिसून आला. शेतकर्यांना कुठलेही बिल न देता युरीयाची ज्यादा दराने विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.बोरी अड़गाव येथे काही शेतकऱ्यांवर दुबारपेरनीची वेळ आली आहे, तर एकीकडे राज्यात यूरीया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी केंद्र चालक यूरिया खताच्या बॅगांचा काळा बाजार करत जास्त दराने विक्री करीत असताना दिसत आहे.अशा वेळेस राज्य सरकारने जास्त दरात युरिया ची विक्री करणाऱ्या कृषी केंद्राचे परवाने रद्द करायला पाहिजे मात्र यांच्या वर थातुर-मातुर कारवाई करुन सोडण्यात येते. याप्रकरणी सदर दुकानदारास कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली असून पुढील चौकशीअंती कारवाई केली जाईल असे गिरी यांनी सांगितले. याप्रकरणी कारवाई होते की कागदोपत्री सोपस्कार आटपून प्रकरण रफादफा केल्या जाते. याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.