खामगाव :अखिल भारतीय मराठा महासंघ अंतर्गत बुलढाणा जिल्हा अखिल भारतीय मराठा महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीमती अनिता तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना हे नियुक्ती पत्र बुलढाणा जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन दिले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रथमताच बुलढाणा जिल्हा महिला महासंघाच्या कार्यकारणीची व संघटनेचे गठन करण्याचा निर्णय महासंघाच्या वतीने घेण्यात आला व अखिल भारतीय मराठा महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी पहिली महिला जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीमती अनिता तनपुरे यांची नियुक्ती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार यांनी जिल्हाध्यक्ष रामदादा मोहिते यांच्याशी विचार विनिमय करून एका नियुक्ती पत्रकाद्वारे केली आहे. त्यांनी या नियुक्ती पत्रकात नमूद केले आहे की ही नियुक्ती जाहीर केल्यापासून तीन महिन्याच्या कालावधी पर्यंत राहील या कालावधीमध्ये आपण संपूर्ण जिल्हा भर महिला संघटन मजबूत करण्यासाठी सर्व जुन्या व नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्य करावे आपले हे तीन महिन्याच्या कालावधीतील कार्य पाहून आपली नियुक्ती कायम करण्यात येईल असे त्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.

हे नियुक्ती पत्र प्रदान करण्याच्या प्रसंगी सर्व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर आप्पा भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की काही दिवसां आगोदरच नेहमी सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे खरे समाजसेवक बंडूभाऊ तनपुरे यांचे कोरना आजारामुळे दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने तनपुरे परिवारासह मराठा समाजाची खूप मोठी हानी झाली. या दुःखातून अनिता ताईंनी स्वतःला व स्वतःच्या परिवाराला सावरून बंडू भाऊंचे समाजसेवेचे कार्य पुढे अविरत सुरू राहावे

याकरिता व समाजा तील महिला भगिनीन ला सहकार्य करण्यासाठी समाजाप्रती आपले योग्य असे दायित्व निभवण्यासाठी स्वतःहून महिला सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारून सर्व समाजाला अभिमान वाटावा असे कार्य करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळण्याचे तयारी स्वतःहून दर्शविल्याने त्यांचीही नियुक्ती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे असे सांगितले. सर्व समाज बांधवांच्या वतीने या पहिल्या महिला जिल्हाध्य पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल सर्वांच्या वतीने श्रीमती अनिता तनपुरे यांचे अभिनंदन करून त्यांच्यापुढील महिला संघटनेच्या संघटनात्मक कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, माजी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ माने, रमाकांतजी गलांडे, संभाजी तनपुरे,विकास चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष शेळके, संजय शिंनगारे, कल्याण गलांडे, जिल्हा सरचिटणीस किशोरआप्पा भोसले,शहर अध्यक्ष राजेश मुळीक, तालुका युवक अध्यक्ष संतोष येवले, शैलेश तनपुरे, अभिषेक तनपुरे हे उपस्थित होते.