राज्यस्तरावर बुलडाणा जिल्ह्यात नव्या चेहऱ्यांना संधी
खामगाव : महाराष्ट्रामध्ये नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य स्तरावर काम करण्याची संधी देण्यात येत आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बुलडाणा जिल्ह्याला कॉंग्रेस चे दिग्गज नेते माजी केन्द्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी कॉंग्रेस पक्ष्यात काम करणाऱ्या नेत्यांना संधी देवून जिल्ह्यात नव चैतन्य निर्माण केले अशी कार्यकर्त्याची भावना आहे. खामगाव येथील धनंजय देशमुख यांची महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी च्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

देशमुख हे सन १९९२ पासून युवक काँग्रेसमध्ये जोडलेले आहेत. त्यांनी बुलढाणा लोकसभा अध्यक्ष ,तसेच अमरावती विभागीय प्रदेश समन्वयक तसेच काँग्रेस पक्षामध्ये पक्ष निरीक्षक म्हणून छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेस पक्षाच्या अत्यंत मोठ्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महाराष्ट्र मधील कॉंग्रेस चे मोठे नेतृव स्व विलासराव देशमुख, माजी राज्यसभा सदस्य खा.राजीव सातव ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , सांस्कृतिक मंत्री ना.अमित देशमुख , महिला बालकल्याण मंत्री ना.याशोमती ताई ठाकूर, माजी आ दिलीप सानंदा यांच्या समवेत त्यांनी कॉंग्रेस चे काम केले आहे.

बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी माजी आ.राहुल बोंद्रे यांची फेरनिवड झाली असून महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी च्या प्रदेश सचिव पदी खामगाव चे धनंजय देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड अ.भा.कॉंग्रेस कमिटी चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी केली आहे. या नियुक्ती चे श्रेय अ.भा कॉंग्रेस च्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी ,प्रियंका गांधी वडेरा, कॉंग्रेस चे मुकुल वासनिक याना दिले आहे. राज्यातील काँग्रेसच्या अत्यंत महत्त्वाचे नेते प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास सार्थ ठरवून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी धनंजय देशमुख यांना नियुक्ती देवून पुन्हा एकदा राज्यस्तरावर संधी दिली आहे, त्यामुळे कॉंग्रेस पक्ष्याला नवीन चेहरे हे चांगला प्रभाव पाडून आपली कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतील यात शंकाच नाही.