संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथील दोन इसमावर अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 11 जून रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्प , अकोट वन्यजीव विभाग अकोट मधील वनपरीक्षेत्र सोनाळा मधील खडकपाणी या ठिकाणी निमखेडी येथील दोन व्यक्ती वरती अस्वलाने हल्ला केल्याने दोघांचा जागीच मुत्यू झाला. अशोक मोतीराम गवते वय 52 व माणा बंडु गवते वय 42 वर्ष हे दोन्ही रा.निमखेडी तालुका संग्रामपुर येथील आहेत.अशोक गवते व माणा बंडू गवते हे दोघेही आपल्या सहकाऱ्यासोबत आपली गुरढोर शोधण्यासाठी सकाळी 7 वाजता गेले असता झाडामधे लपुन बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला,त्यांनी अस्वलाला हाकालण्या प्रयत्न केला परंतु हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला व माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले होते.
दुपारपर्यंत त्यांचे मृतदेह घटनास्थळी पडलेले होते. दुपारी 3:30 वाजता सदर घटनास्थळी वनरक्षक श्री ए.आर.तोटे व इतर कर्मचारी पोहचले असता दोन्ही व्यक्ती मृत झाल्याचे दिसुन आले . त्या दोन व्यक्तीच्या मृतदेहापासुन अंदाजे 15 ते 20 मिटर अंतरावरती सुमारे 6 ते 8 महीणन्याचे दोन अस्वलांची पिल्ले मरण पावल्याचे दिसुन आले व त्याचे अंगावरती कुर्हाडीने मारल्याच्या जख्मा दिसुन आल्या माहीती मिळताच घटनास्थळावरती पोलीस स्टेशन सोनाळा पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार ,सचिन राठोडआणि उपवनसंरक्षक , व मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अकोट हे दाखल झाले. दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात वरवट बकाल येथील शवविच्छेदन करण्यात आले आणि पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहे.