रुग्णालयातून डिस्चार्ज आता होम क्वारंटाईन
मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. अशोक चव्हाण यांना आज ( 4 जून ) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 25 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.अशोक चव्हाण यांच्यावर 10 दिवस उपचार सुरु होते अखेर 10 दिवसानंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर अशोक चव्हाण यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. आता अशोक चव्हाण हे मुंबईतील घरी 14 दिवस क्वारंटाईन असतील.नुकतेच अशोक चव्हाण मुंबईहून नांदेडला गेले होते.तिथे त्यांनी कोरोनाची चाचणी केली तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.अशोक चव्हाण हे लॉकडाऊनच्या काळात दोन महिने नांदेडमध्येच होते.मात्र मध्यंतरी विधानपरिषद निवडणुकीसाठी ते मुंबईला गेले होते.या निवडणुकीनंतर ते पुन्हा नांदेडला परतले.नांदेडला येऊन ते स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं.नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रिपोर्टनंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्येच उपचार घेतले.पण पुढील उपचारासाठी ते नांदेडहून मुंबईकडे आले होते.यापूर्वी महाविकास आघाडीमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आव्हाड यांनी कोरोनावर मात करुन,ते आता घरी परतले आहेत.
ReplyForward |