खामगांव : सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे मात्र असे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरु आहे. यामध्ये पूर्णा नदीकाठी असलेल्या गावांजवळ अवैध रेती वाहतूक करणारे वाहने रात्रभर रेतीची वाहतूक करीत आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातील माटरगाव, भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या पात्रातुन खामगाव शहराकडे रेती घेऊन येत असणाऱ्या टिप्पर चालकाने आपले वाहन थेट जलंब पोलिस स्टेशनचे कर्मचाऱ्याच्या अंगावरून टाकले होते त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथील रेती वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसानंतर पुनः रेती वाहतूक सुरु झाली आहे याकडे महसूल विभाग व पोलिस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. तर काल १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अवैध रित्या वाहतूक करणारे २ वाहने तहसील मंडळ अधिकारी एन के रत्नपारखी तलाठी यांनी पथकासह गुप्त महितीच्या आधारे नांदुरा रोडवरिल सुटाळा बु फाट्या जवळ चारशे सात वाहन क्र एम एच २८ बी बी १२३१ मालक निलेश फुंडकर रा नारखेडे व पिंपळगांव राजा रोडवर वस्तिगृहा जवळ एम एच 28 एच 6531मालक शेक साबीर शेक बिलाल रा पी राजा या दोन्ही वाहनाला पकडले. त्यामद्धे दोन्ही वाहनात साडे तीन ब्रास रेती असुन सदर दोन्ही वाहनधारकांना नोटीस देण्यात आल्या असल्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांनी दिली असुन दोन्ही वाहने ग्रामीण पोलिस स्टेशन ला लावण्यात आली आहे.