November 20, 2025
अकोला खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा बातम्या बुलडाणा

अवैध पने सालई गोंधने भरलेल्या चारचाकी वाहन पकडले अकोट वन्यजीव विभागाची कार्यवाही…

१० क्विंटल सालई गोंदसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त….

जळगाव जा:गोपनिय माहितीच्या आधारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अंबाबारवा अभरण्याअंतर्गत सोनाळा परिक्षेत्राअंतर्गत बफर क्षेत्रातील जामोद येथुन एक खाजगी चारचाकी वाहनात सालई गोंद भरुन जाणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या भागमध्ये नाकाबंदी करण्यात आली.रात्री २.३० वा एक खाजगीवाहन आले असता त्याला थांबविण्याकरीता हात दाखवला असता तो भरधाव वेगाने निघुन गेला. त्यानंतर वनकर्मचारी यांनी त्या खाजगी वाहनाचा पाठलाग करुनजळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध गावाजवळ पकडत्यात आल.परंतु तत्पुर्वी वाहनातील वाहन चालक यांनी वाहन सोडुन पळ काढला.वनकर्मचारी यांनी वाहन टाटा मोटर टाटा सुपर एस. क्रमांक एम एच ०४ ईए ९३३५ सालई गोंद अंदाजे ९३५ कि.लो.एकुण ४०७००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन वनगुन्हा क्रमांक ०५९९1/१४९७६२भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.हि कारवाई मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी मॅडम,मा. उपवनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजिव विभाग अकोट,नवल किशोर रेडडी, सहा.वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजिव सोनाळा सुनिल वाकोडे यांनी केली आहे तरी सर्व नागरीकांना आवाहण करण्यात येते की अशी कोणतीही माहीती मिळताच १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 493 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 81 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

महिला व बालविकास भवन कक्षाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

nirbhid swarajya

जिल्ह्यात प्राप्त 376 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 184 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!