बुलडाणा : जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कोणीच बोलायला तयार नाही.? शासन प्रशासनाच्या कृपाशिर्वादातूनच बुलडाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. शेतकरी,कामगार आर्थिक विवंचनेत असतांना अवैध धंद्यांना ऊत आल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची व आत्महत्येची वेळ जिल्ह्यात आलेली आहे. त्यामुळे त्वरित बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्या घरासमोर वरली चे दुकान सुरू करणार असल्याचे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोठे यांनी जाहीर केले आहे.मागील पंचवीस वर्षांपासून जिल्ह्यातील व शहरातील अवैध धंदे बंद ठेवण्यासाठी आझाद हिंद संघटना सर्वस्व पणाला लावत रस्त्यावर उतरली आहे.अवैध धंद्यांना विरोधात शासन प्रशासनासोबत लढा देत असताना असंख्य गुन्हे अवैद्य धंदे बंद करण्यासाठी आम्हि स्वतःवर लावून घेतले. अनेक वेळा तुरुंगवासही भोगला.तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कारागृहात राहून आणि रस्त्यावर अशा दोन्ही लढाया आझाद हिंद संघटनेने अविरत नऊ महिने आंदोलनात्मक लढा दिला.त्यानंतरही सातत्याने आंदोलनात्मक पवित्रा घेत जिल्ह्यात अवैध धंद्याची कीडच लागनार नाही यासाठी आझाद हिंद संघटना लढत आहे. परंतु सद्यस्थितीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील अवैद्य धंदे आणि गुटखा विक्री बंद ठेवण्याचे जाहीर आवाहन केले होते. बुलडाणा जिल्हा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्याचे आश्वासनही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिले होते.नेमके अवैद्य धंदे बंदचे की अवैद्य धंदे सुरू करण्याचे पॅटर्न महाराष्ट्रात राबविणार आहेत…?हे प्रथम त्यांनी जाहीर करावे व जिल्ह्यातील अवैद्य धंदे त्वरित बंद करावे. अन्यथा आपल्या घरासमोर वरलीचे दुकान लावणार असल्याचे एक आंदोलन आझाद हिंद शेतकरी संघटना राबविणार आहे.बुलडाणा जिल्ह्याची, शहराची संस्कृती,वारसा अबाधित ठेवण्यासाठी.अवैद्य धंदे मुक्त जिल्हा, शहर ठेवण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटना आंदोलनात्मक पवित्रा घेत रस्त्यावर उतरणार आहेत. त्वरीत सर्व अवैद्य धंदे बंद न झाल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर वरली चे दुकान लावणार असल्याचे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांनी सांगितले आहे.
previous post