खामगाव : उपविभागिय पोलीस अधिकारी अमोल कोळी खामगांव यांचे पथकाने अवैध दारु वाहतुक करणारे इसमांना पकडले असून दारू साठा जप्त केला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची अवैध दारू विक्री विरोधात धडक कारवाई करत सव्वालाखाचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली आहे. आज ड्रायडे असल्याने दारू तस्करावर पोलीस पाळत ठेवून होते, काल गुरुवारी रात्री आकाश राजु कुऱ्हाडे वय २६ वर्ष रा. पारखेड ता. खामगांव ,अजय देविदास रामेकर वय १९ वर्षे रा, टेंभुर्णा ता, खामगांव हे महामार्ग क्रमांक ६ वर जुगनु टी पॉईंट वर काल रात्री ११:३० च्या सुमारास अवैधरित्या दारू वाहतूक करतात आढळून आले. त्यांच्या कडून दुचाकी सह ५०२०२/-रुपायाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच अमोल सुधाकर जाभे वय ३२ वर्षे रा. गोधनापुर ता.खामगांव यास घटनास्थळ ऋ्शी संकुल टी पाँईंट जवळ अवैध दारू नेताना पथकाने पकडून दुचाकीसह ६८०९६/- रु चा मुद्देमाल जप्त केला आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५८/२०२० क.६५ (आ) म.दा.का. नुसार पो.ना. सुधाकर थोरात यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया बुलडाणा, अपर पोलीस अविक्षक हेमराजसिंह राजपुत खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागिय पोलीस अधिकारी अमोल कोळी खामगांव यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे पथकातील पो ना. सुधाकर थोरात, पो.का. विशाल कोळी यांनी केली.
previous post