बुलढाणा : बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखा, बलढाणा पथक हे बुधवारी रात्री रात्रगस्तीवर असतांना खात्रीलायक खबरेवरून स्टेट बैंक चौक, बुलडाणा शहर येथे सापळा रचून भरधाव वेगाण जाणारे वाहन महिन्द्र पिक अप हे ताब्यात घेवून तपासणी केली. त्यामध्ये देशी दारु टँगो पंच कंपनीचे तब्बल 47 बॉक्स अवैधरित्या मिळून आले. या वाहनाचा चालक दयानंद शिरसाट व सोमनाथ नाना कोळी दोन्ही राहणार खामखेड ता. शिरपूर जि. धुळे याना ताब्यात घेण्यात आले असून यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम कलम 65 (अ)(ई) प्रमाणे पो.स्टे.बुलडाणा शहर येथे कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान अवैध देशी दारू. वाहन व इतर साहीत्य असा एकुण 4.71.850/- रु चा मुद्देमाल जप्न करण्यात आला.