निर्भिड स्वराज्यच्या बातमीचा दणका….
खामगाव : खामगाव-बुलडाणा मार्गावरील रोहणा शिवारातील गट नं.९२ मध्ये अवैध उत्खनन करुन ७ हजार ब्रास मुरुम नेल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे सदर कंपनीला तहसीलदार खामगाव यांनी ७ कोटीचा दंड ठोठावला आहे. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अशोक हटकर यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार करुन चौकशीची मागणी केली होती. तसेच निर्भिड स्वराज्यने या बाबत सर्वात पहिले बातमी प्रकाशित केली होती. व या प्रकारणाचा सतत पाठपुरावा केला होता. सदर कंपनीने केलेल्या या उत्खननाला तत्कालीन तलाठी शेळके यांची व अजून ज्यांची साथ होती त्यांच्या विरुध्दही कारवाई होणे गरजेचे आहे असे मत या दंडात्मक कारवाई नंतर अशोक हटकर यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना व्यक्त केले आहे. उपरोक्त शिवारात जांदू कंस्ट्रक्शनने मिक्सिंगचा प्लॉन्टही उभारला आहे. याबाबत झालेल्या कारवाईत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये सदर गौण खनिजाचे बाजार मुल्य २ हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे पाच पट रक्कम आकारल्या जाते. सदर ब्रासच्या रॉयल्टी मुल्यासह उपरोक्त दंड आकारण्यात आला आहे.