October 6, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

अवैध अग्निशस्त्र विक्री करणारा अटकेत ; 5 पिस्टल जप्त

जळगाव जामोद : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया बुलडाणा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,बुलडाणा यांना बुलडाणा जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे विकण्याऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी पथके नेमली होती. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा पथकाने दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी पोलीस स्टेशन जळगांव जामोद हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, काही ईसम अवैध अग्निशस्त्र विक्री करीता घेवुन येत आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे जळगांव जामोद येथील बऱ्हाणपुर चौक येथे नाकाबंदी केली असतांना दोन अनोळखी ईसम मध्यप्रदेश मधुन दुचाकीने येतांना दिसले. ती दुचाकी पोलीस स्टाफचे मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक ईसम पकडण्यात आला. एक ईसम अंधाराचा फायदा घेवुन जगंलाच्या दिशेने पळुन गेला. पकडलेल्या ईसमांस नाव गांव विचारले त्याने त्याचे नाव भोरु भुवानसिंग रावत वय २५ वर्ष रा. शेकापुर ता. खकनार जि. ब-हाणपुर मध्ये प्रदेश असे सांगतले.यावेळी पोलिसांनी त्याची तपासणी केली असता आरोपीकडुन एकुण ५ देशी बनावटीचे कट्टे मॅगझिनसह एकुण किंमत. २,५०,०००/- रु. १५ जिवंत काडतुसे एकुण किंमत. ७,५००/- रु. एक दुचाकी किंमत.५०,०००/- रु. एक सँमसंग दोन सिम असलेला मोबाईल किंमत. ५०००/- रु.नगदी १९४०/- रु. असा एकुण ३,१४,४४०/ रु. मुददेमाल जप्त करुन आरोपींवर शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे कार्यवाही करुन पोलीस स्टेशन जळगांव जामोद यांचे ताब्यात दिले आहे.वरील कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया,अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत,अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते, यांचे आदेशाने नागेशकुमार चतरकर,निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पो.हे.कॉ. अत्ताउल्लाखान, पोना. गजानन आहेर, पो.कॉ.युवराज शिंदे, पो.कॉ.सतिष जाधव, म.पो.कॉ. सरिता वाकोडे यांनी सदर कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.

Related posts

केंद्र सरकारची हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही -माजी आमदार सानंदा

nirbhid swarajya

राष्ट्रवादी खामगाव शहरच्या वतीने कोरोना सुरक्षा किटचे वाटप

nirbhid swarajya

तलवारबाजी स्पर्धेत अनुराधा सोळंकी ची यश

nirbhid swarajya
error: Content is protected !!