नांदुरा – मोताळा रस्त्यावर वडाळी फाट्याजवळ कारवाई
बुलडाणा : वनविभागातंर्गत मोताळा वनपरिक्षेत्रात 7 मार्च 2021 रोजी नांदुरा – मोताळा रस्त्यावर टाटा 407 वाहन विना परवानगीने निंबाचे अवैध लाकूड वाहताना आढळले. या वाहनावर वडाळी शिवारातील माऊली पेट्रोल पंपाजवळ कारवाई करण्यात आली. सदर वाहनाला हात देवून थांबविले असता वाहनात अवैध रित्या निंबाचे लाकूड आढळून आले. वाहन चालक शे. रजीक शे. महबुब वय 22 रा. वसाडी खु ता नांदुरा यास परवानगी व पास परवानाबाबत विचारले असता त्याने परवानगी व पास नसल्याचे सांगितले. याबाबत वाहन चालकाकडे अधिक चोकशी केली असता वाहन चालकाने सदर लाकडे मौजे शेंबा शिवारातून गाडी मालक शे. शाकीर शे जफीर रा. वसाडी खु यांनी आणावसाय सागितल्याची माहिती दिली. याप्रकरणी वाहन क्रमांक एमएच 27 ए 4011 मध्ये निंब प्रजातीचे 08.00 घ.मी लाकडे अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतुक करण्याबाबत वनगुन्हा क्रमांक 763/16 7 मार्च रोजी जारी करण्यात आला. जप्त करण्यात आलेले वाहन टाटा 407 मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये जप्त करून ठेवण्यात आले आहे. सहायक वनसंरक्षक बुलडाणा व वनपरिक्षेत्र अधिकारी खामगांव, वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42 व महाराष्ट्र वन नियम 2014 मधील 31,47, 82, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 3 अन्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी कळविले आहे