शेगांव : अवैधरित्या रेल्वेचे तात्काळ ई-तिकिट बनवून विकणाऱ्या सायबर कॅफे चालकाला रेल्वे सुरक्षाबलाच्या पथकाने सुरक्षा शेगाव येथे छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्याकडून काही रोख रकमेसह संगणक व साहित्य जप्त करण्यात आले आहे. यावेळी कॅफे चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रेल्वे तिकिटातील काळाबाजार करणाऱ्या अवैध दलालांना रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील तीन ठिकाणी अवैधरित्या रेल्वेचे इ तिकीट, व तात्काळ तिकीट बनवून विकल्या जात असल्याची माहिती रेल्वेच्या सुरक्षा विभाग भुसावळ ला मिळाल्यावरून पथकाने चौकशीस सुरुवात केली होती. यात शेगाव येथील भगवान बाबा सायबर कॅफे वरून अवैधरित्या रेल्वेचे तिकिटं बनविल्या जात असल्याचे आय पी अड्रेस वरून समजले. यानंतर सुरक्षा पथकाने सापळा रचून आज गुरुवारी सकाळी सदर कॅफे वर धाड टाकून तिकीट बनविण्यासाठी साठी वापरल्या जाणारे संगणक व साहित्य जप्तकरून कॅफे चालकाला ताब्यात घेऊन भुसावळ ला घेऊन गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सामान्य जनतेला रेल्वे विभागाने आवाहन केले आहे की, कुठल्याही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या अवैध दलालांना बळी न पळता त्यांच्याकडून तिकिट विकत घेवू नये व असा प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी जवळच्या आरपीएफ ठाणे किंवा ऑल इंडिया यात्री सुरक्षा हेल्पलाईन १८२ वर सुचना द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
previous post