November 20, 2025
खामगाव

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

खामगांव : उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दुचाकीवरुन दारुची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे दुचाकीवर अवैधरित्या विनापरवाना देशी दारुची वाहतुक करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या पथकाने २० मे रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान शेगांव तालुक्यातील वरुड शिवारात कोलोरी ते जवळा रोडवर केली. बाळकृष्ण ऊर्फ करण ऊर्फ गोलु कळसकर वय २८ रा.जवळा पळसखेड, ता. शेगांव व गौतम गवई वय ३० रा. जवळा पळसखेड, ता. शेगांव, हे दोघे दुचाकीवर विनापरवाना अवैधरित्या देशी दारुची वाहतुक करताना मिळुन आले. त्यांच्याकडून देशी दारुच्या ९० मि. ली. च्या १०० नग शीष्या कि. २ हजार ६०० माल जप्त केला आहे. तसेच दुचाकी क्र एम एच् -२८-ए एल -१८८२ कि.३०,००० रु.असा एकूण ३२ हजार ६१० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला. बाळकृष्ण ऊर्फ करण ऊर्फ गोलु कळसकर व गौतम गवई या दोघांविरुध्द खामगांव ग्रामीण पोस्टे मध्ये कलम ६५ (अ)(इ) मदाका नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पथकातील पो.ना. सुधाकर थोरात, पो.ना. शांताराम खाळपे यांनी केली आहे.

Related posts

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya

बिल काढण्याकरता ९० हजार रुपयाची लाच मागणार्‍या ग्रामसेवकावर एसीबीच्या ट्रॅप

nirbhid swarajya

आ.आकाश फुंडकर यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

nirbhid swarajya
error: Content is protected !!