खामगांव : उपविभागात अवैध धंद्याना मोठ्या प्रमाणात उत आले आहे.अवैध धंद्याना आळावा बसण्याकरीता पोलिस विभागाने गेल्या काही दिवसांपासून उपविभागात अवैध धंदे जुगार ,मटका, दारू वर मोठया प्रमाणात कारवाही चा झपाटा लावला आहे.उपविभागात खामगाव शेगाव, जलंब पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या दहा दिवसांत सात मोठ्या कार्यवाह्या करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणुन जलंब पोलिस स्टेशन हद्दीतील पहुरजीरा जवळील रेल्वे गेट जवळ दिनांक १९ मार्च २० रोजी दुपारच्या सुमारास परमेश्वर एकनाथ पवार २४, अक्षय राजु मिसाळ २२ हे मोटार सायकल क्रमांक एम एच ३० ई १४५५ ने विनापरवाना अवैधरित्या दारूची वाहतुक करताना मिळुन आले.त्यांच्या कडून देशी दारूच्या एकूण ३४४ नग बॉटल व दुचाकी असा असा एकूण ४०,२२२रु मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.ना शांताराम खाळपे यांनी जलंब पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादी वरून उपरोकक्त दोघांविरुद्ध कलम ६५(अ),७७(ब)मदाका नुसार गुन्हा दाखल केला आहे.हि कार्यवाही उपविभागीय पथकातील पो.ना सुधाकर थोरात, पो.ना नितीन भालेराव यांनी केली आहे.
previous post