खामगांव : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या तांदळाची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची गुप्त माहिती तहसील अधिकाऱ्यांना मिळाली या महितीच्या आधारे आवार येथे ४.५० क्विंटल तांदूळ पकडण्यात आला. माल विकत घेणाऱ्यावर जीवनावश्यक वस्तु कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खामगाव तालुक्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत तांदळ निशुल्क वाटप करण्यात आला होता. तर २६ ऑगस्ट रोजी बुधवारी सायंकाळी खामगाव तालुक्यातील आवार येथे व्यावसायिक माल वाहु क्र एम एच २८ एबी १६५० मद्धे तांदूळ घेऊन जात असताना गुप्त माहिती तहसील यांना मिळाली होती या महितीच्या आधारे बर्डे प्लॉट येथील शेख नदीम शेक नयीम हा लाभार्थ्यांकडून १० प्रति किलो प्रमाणे तांदूळ विकत घेत असताना निरीक्षक अधिकारी विशाल भगत यांना मिळून आला.त्याच्याजवळून ४.५० क्विंटल तांदूळ ७ हजार व माल वाहु टाटा एस २,००,००० असा एकूण २ लाख ७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणी निरीक्षक अधिकारी यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादि वरुन उपरोक्त आरोपी विरूद्ध कलम ३ , ७ जीव जीवनावश्यक वस्तु कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहे.
previous post