बुलढाणा:जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसाने एका निष्पाप बालिकेचा बळी घेतला! संग्रामपूर तालुक्यात भिंत कोसळून अडीच वर्षीय बालिकेचा अंत झाल्याची घटना घडली.
संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पावसाने काही ठिकाणी संमिश्र स्वरूपाची हजेरी लावली.
तालुक्यातील काटेल येथे झालेल्या मुसळधार पावसाने गणेश रमेश बोरवार यांच्या घराची भिंत कोसळली. यामुळे कृष्णाली गणेश बोरवाल या अंदाजे अडीच वर्षीय बालिकेचा करुण अंत झाला.यावेळी नजीकच असलेली तिची बहीण राधा मात्र सुदैवाने बालंबाल बचावली! या घटनेमुळे काटेल गावात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.एकलारा, काटेल चे तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल संग्रामपूर तहसीलदार याना सादर केला आहे.